Pune : 10 लाखांची लाच स्वीकारताना बडतर्फ विधी अधिकाऱ्यासह एकाला अटक

एमपीसी न्यूज- विधी अधिकारी या पदावर कार्यरत असल्याचे भासवुन मोका कायद्याच्या संदर्भात प्राप्त प्रस्तावावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी १० लाखांची लाच स्वीकारताना बडतर्फ विधी अधिकाऱ्यासह एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी (दि. 12) ही कारवाई करण्यात आली.

शशीकांत जयप्रकारा राव (वय 50 रा.मुंढवा पुणे) व चंद्रकांत देवराम कांबळे, बडतर्फ विधी अधिकारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे. अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी 39 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालकाविरुद्ध मोका कायदयाच्या संदर्भात प्राप्त प्रस्तावावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी आपण स्वतः विधी अधिकारी या पदावर कार्यरत असल्याचे भासवुन आरोपी चंद्रकांत कांबळे याने १० लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीची शहनिशा करून सापळा रचून आरोपी चंद्रकांत कांबळे याला १० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.