Talegaon Dabhade : एनएमआयईटीची ऋतुजा पवळे तिहेरी उडीमध्ये प्रथम

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रीडा विभाग तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा पुणे विद्यापीठात पार पडल्या. यामध्ये तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मधील प्रथम वर्ष संगणक विभागातील ऋतुजा पवळे हिने तिहेरी उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या विजयामुळे तिची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यामधील एकूण एकशे वीस महाविद्यालयांमधील 1200 हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध मैदानी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मधील प्रथम वर्ष संगणक विभागातील ऋतुजा पवळे हिने तिहेरी उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. ऋतुजा हिची विभाग स्तरावर निवड झाली आहे. तसेच बीव्होक कोर्स मधील नम्रता सोनावणे हिने उंच उडी मध्ये तिसरा क्रमांक मिळविला.
संस्थचे अध्यक्ष, मा राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य. डॉ विलास देवतारे आणि विभाग प्रमुख यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक राजेंद्र लांडगे यांचे मार्गदर्शन (Talegaon Dabhade)  लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.