Talegaon Fraud: बनावट हक्कसोड पत्र तयार करत एकाची तळेगावात फसवणूक

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथे बनावट हक्कसोड पत्र तयार करत त्यावर बनावट सही आणि शिक्के मारून दस्त बनवत एकाची फसवणूक करण्यात आली आहे.(Talegaon Fraud) हा प्रकार 14 डिसेंबर 2000 ते 25 जून 2021 या कालावधीत घडला असून, याप्रकरणी शनिवारी (दि. 30) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तळेगाव पोलीस ठाण्यात गजानन निवृत्ती खडेकर (वय 58, रा. फुरसुंगी पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग पंघाजी शेलार उमाजी पंघाजी शेलार, सोपान पंघाजी शेलार (सर्व रा. निगडे, ता. मावळ) आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ED Detain Sanjay Raut: संजय राऊत यांना घेऊन ईडी रवाना, संजय राऊत यांचं हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नोटरी करण्याचा अधिकार नाही. (Talegaon Fraud) तरीदेखील आरोपींनी बनावट नोटरी विनामोबदला हक्कसोड पत्र तयार करून त्यावर फिर्यादी यांच्या नावाचे शिक्के आणि सही केली. त्याचे दस्त वापरून फिर्यादीची फसवणूक केली आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.