Punavle Burglary: पुनावळेमध्ये सव्वा दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज : पुनावळे गावात चोरट्यांनी घरफोडीत दोन लाख 36 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदिचे दागिने चोरले आहेत. (Punavle Burglary) हि घटना शनिवारी (दि.30) दुपारी अवघ्या दीड तासाच्या कालावधीत घडली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सचिन पांडुरंग चव्हाण (वय 44, रा. कोयते वस्ती, पुनावळे गाव) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट शनिवारी दुपारी दीड ते तीन वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होता. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला.

 

Talegaon Fraud: बनावट हक्कसोड पत्र तयार करत एकाची तळेगावात फसवणूक

 

बेडरूम मधील कपाटाचे लॉकर उचकटून त्यातून 90 हजारांचे मंगळसूत्र, 30 हजारांचा राणीहार, 30 हजारांच्या बांगड्या, 15 हजारांची चेन, नऊ हजारांची अंगठी, सहा हजारांची नथ, 15 हजारांचे मंगळसूत्र, 30 हजारांचे कानातील झुमके कर्ण वेल, पाच हजारांचे ब्रेसलेट, (Punavle Burglary) सहा हजार रोख रक्कम असे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 36 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्राकरणी रावेत पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.