Talegaon Dabhade : इनरव्हील  क्लबआयोजित आंतरशालेय बोधप्रद कथा-कथन स्पर्धेचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आंतरशालेय बोधप्रद कथा कथन ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 24 पेक्षा अधिक शाळांमधील 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला (Talegaon Dabhade )आहे.
ही स्पर्धा इनर व्हीलच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या पुढाकाराने व प्रकल्प प्रमुख भारती शाह आणि मुग्धा जोर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आदर्श विद्या मंदिर’ येथे पार पडल्या. परीक्षक म्हणून सतीश ढेंबे, ज्योती मुंगी व श्रीकृष्ण पुरंदरे यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण समारंभात प्रविण साठे, निशा पवार, मीरा बेडेकर, संध्या थोरात, डॉ लता पुणे, वैशाली चव्हाण, रश्मी थोरात, साधना भेगडे,आरती भोसले, निलिमा बारटक्के, ममता मराठे, दीपा चव्हाण, संगिता शेडे, अलका पटवा, हेमा खळदे, मोहिनी भेगडे, संगीता शेडे ,अर्चना देशमुख, दिपा राऊत, स्नेहल निंबाळकर हे क्लब सदस्य उपस्थित होते.
सर्व शाळांचे मुख्याध्यापक व आदर्श विद्यामंदिरचे यादवेंद्र खळदे यांनी विशेष सहकार्य केले. स्पर्धेला मुलांचा उदंड  प्रतिसाद मिळाल्याने आमचा उद्देश सफल झाला असे मत वैशाली दाभाडे यांनी व्यक्त केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
लहान गट इयत्ता 3 री  ते 5 वी
प्रथम क्रमांक – मृण्मयी धनाजी कदम (जैन इंग्लीश स्कूल)
द्वितीय  क्रमांक – सौम्या अमोल अलबते (आदर्श  विद्या  मंदिर)

तृतीय क्रमांक – श्रीराज अजित मु-हे (सह्याद्री  इंग्लीश  मिडीयम स्कूल)
उत्तेजनार्थ 1 – अन्वय सुमित धोपाटे (आदर्श विद्या मंदिर)
उत्तेजनार्थ 2 – समर्थ निकम (संत ज्ञानेश्वर  प्राथमिक  शाळा..क्र.6)
मध्यम गट इयत्ता 5वी ते7वी
प्रथम क्रमांक – प्रांजल प्रशांत मुर्हे (जैन इंग्लीश स्कूल)
द्वितीय क्रमांक – विशाखा विश्वास नाईक (सह्याद्री इंग्लीश मिडीयम स्कूल)
तृतीय क्रमांक – आराध्या राकेश बच्छाव (आदर्श विद्या मंदिर)
उत्तेजनार्थ 1 – पूर्वा बाळासाहेब जाधव (स्वामी विवेकानंद स्कूल)
उत्तेजनार्थ 2 – सानिका कमलेश मोडक (जैन इंग्लीश स्कूल)
मोठा गट इयत्ता 8वी ते 10वी
प्रथम क्रमांक – श्रावणी गणेश मु-हे (आदर्श विद्या मंदिर)
द्वितीय क्रमांक – अमृता बाळासाहेब जाधव (स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कूल)
तृतीय क्रमांक – स्नेहा आशिष भलकट्टे (अॅड.पु. वा.परांजपे विद्यालय)
उत्तेजनार्थ 1 – अभिनव दीपक दहीवाल (अॅड.पु.वा. परांजपे विद्यालय)
उत्तेजनार्थ 2 – शामल लक्ष्मण धोत्रे (नगर परिषद माध्यमिक विद्यालय, क्रमांक 6)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.