Talegaon Dabhade : तळेगाव-चाकण रस्त्यावरील दुभाजक गायब

एमपीसी न्यूज- तळेगाव-चाकण रस्त्यावरील दुभाजक रस्त्याच्या पातळीवर आला असून त्यामुळे या रस्त्यावर वारंवार छोटे-मोठे अपघात होत असून त्वरित रस्ता दुभाजकाची उंची वाढवावी अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

तळेगाव-चाकण रस्त्यावरील दुभाजक रस्त्याच्या पातळीवर आल्यामुळे वाहनचालकांना तो दिसून येत नाही. तसेच दुभाजकाच्या खालील पाइप तुटला असल्याची शक्यता असून त्यामुळे याठिकाणी गाडीचे चाक आपटले जाते. एखाद्या जड वाहनाचे चाक फासून अपघात होण्याची शक्यता आहे.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे बुजली असून पावसाळ्यात रस्त्यावर पाणी वाहून रस्त्याची दुर्दशा होते. या ठिकाणी पालिकेने माती टाकून सपाट केलं आहे परंतु खाली जमीन खचत चालली आहे. सध्या पोलिसांनी याठिकाणी बॅरिकेड लावून धोक्याचा इशारा दिला आहे. परंतु संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.