Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संगीता दुबे

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन काँग्रेस (आय) कमिटीच्या महिला उपाध्यक्ष पदी संगीता दुबे यांची निवड (Talegaon Dabhade ) करण्यात आली आहे. संगीता दुबे यांना मावळ तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा हिरे यांच्या व जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

Today’s Horoscope 22 July2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, प्रदेश सदस्य ॲड.दिलीप ढमाले, तालुका कार्याध्यक्षॲड खंडू तिकोणे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, मावळ तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत आदी मान्यवर उपस्थित होते.

संगीता दुबे ह्या तळेगाव स्टेशन परिसरातील स्त्री शक्ती भाजी मंडईच्या अध्यक्षा आहेत.  काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी संगीता दुबे यांनी सांगितले.

तळेगाव शहरात संगीता दुबे यांचे महिलांच्या संघटनांमध्ये भरीव योगदान आहे.महिलांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भरीव कार्य करणार असल्याचे संगीता दुबे यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्षाचे संघटकनात्मक कार्य मजबूत करण्यासाठी महिला वर्गाने पुढाकार घेण्याचे जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांनी आवाहन केले आहे. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले यांनी मार्गदर्शन (Talegaon Dabhade ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.