Maval : माजी विद्यार्थी विकास गायकवाड यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा

एमपीसी न्यूज – नाणे माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी विकास नामदेव गायकवाड यांनी (Maval) आपला वाढदिवस शाळेत येऊन अनोख्या पद्धतीने साजरा केला. विकास गायकवाड यांनी विद्यालयास मुलांना जेवणासाठी 20 ताटे, एक फॅन व सुमारे 100 गुलाबाची रोपे दिली. तसेच विद्यार्थ्यांना या निमित्ताने खाऊ वाटपही करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संगीता दुबे

याप्रसंगी माजी विद्यार्थी निलेश कटके, अतिश गरवड,दिनेश शिंदे,अजय नाणेकर व कडधे येथील विकास गायकवाड उपस्थित होते.

नाणे माध्यमिक विद्यालय,नाणे ता.मावळ येथील माजी विद्यार्थी विकास नामदेव गायकवाड याने आपला स्वतःचा वाढदिवस पुर्वाश्रमीच्या आपल्या शाळेत येऊन अनोख्या पद्धतीने साजरा केला व सामाजिक बांधिलकी व शाळेप्रति असणारे कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

समाजामध्ये वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला जाणारा खर्च हे एक वेगळे वातावरण सगळीकडे आपल्याला दिसून येते परंतु वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून शाळेमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने आपला वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न कांब्रे येथील युवा उद्योजक गायकवाड यांने केला.

त्यावेळी उद्योजक विकास गायकवाड यांनी समाजाप्रती आणि शाळेप्रती असणारी आपले सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला शाळेतील गुरुजन वर्गांचे आपल्यावर ऋण आहेत त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तसेच शाळेप्रती आपुलकी जतन करण्यासाठी मी वाढदिवस शाळेमध्ये साजरा करण्याचे ठरवले, असे विकास यांनी भावना व्यक्त सांगितले.

त्याचप्रमाणे विद्यालयातील शिक्षक श्री पावरा सर यांनी शुभेच्छा देत असताना विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठा व्हावं आपल्या कुटुंबाचे, घराण्याचे, गावाचे, तालुक्याचे नाव मोठं करावं व आपल्याला मदत करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञतेची भावना जतन करावी असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक स्वप्निल नागणे,ज्येष्ठ शिक्षक पोपट पारसे  यांनी विकास गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सहशिक्षक सोमनाथ गोडसे (Maval) यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.