Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे स्कूलचा शिवम राय जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत दुसरा

एमपीसी न्यूज : तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित (Talegaon Dabhade) कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिवम राय याने 14 वर्षाखालील वयोगटात जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. शिवम हा इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. जिल्हा स्तरावर मिळालेल्या यशामुळे त्याची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता आठवीच्या शिवम रायची 14 वर्षाखालील वयोगटात उंच उडीत विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. पुणे जिल्हा विभाग पुणे, यांच्या वतीने तुळजाराम चतुरचंद विद्यालय बारामती येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत कृष्णराव भेगडेचा शिवम राय याने विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी झेप घेतली. मावळ तालुक्यातून विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Maharashtra Winter Session 2022 : दोन वर्षांनंतर नागपुरात गाजणार हिवाळी अधिवेशन; वादात्मक मुद्यांवर होणार खडाजंगी!

संस्थेचे (Talegaon Dabhade) संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्याचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्याला त्याचे क्रीडा शिक्षक गोरख काकडे व सुवर्णा झणझणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.