Talegaon Dabhade News : श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानतर्फे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

एमपीसी न्यूज – श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे यांच्याकडून दहावीमध्ये उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या गुणगौरव समारंभात 17 माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

हा कार्यक्रम लायन्स क्लब सभागृहात पार पडला.  विशाल मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर खळदे, संजय शिंदे, प्रा. महादेव वाघमारे, रेश्मा फडतरे यांनी आपले विचार मांडले.

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक खंडू टकले, अध्यक्ष विजय शेटे, सचिव विनोद टकले, तळेगाव शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक, पत्रकार, उपस्थित होते.

प्रतिष्ठानचे सदस्य मयूर पिंगळे, विराज टोंगळे, आदित्य टकले,  अमोल पाटील,  प्रथमेश शेटे, संग्राम शिंदे, सागर लगड व सहकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.