Talegaon Dabhade : देवराई संस्था हरण्येश्वर टेकडीवर करणार देशी झाडांचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील हरण्येश्वर टेकडीवर 18 एकर क्षेत्रामधे देवराई संस्थेच्या वतीने देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.(Talegaon Dabhade) संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा संकल्प केला असून त्याची सुरुवात सर्व्हंट ऑफ गॉडचे लाल घनशाणी व मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली.

देशी वृक्षारोपण करण्याकरिता, तालुक्यात व इतरत्र अनेक ठिकाणी देवराईसंस्था विविध उपक्रम  राबवत असते,या अंतर्गत येथील हरण्येश्वर टेकडीवर 18 एकर क्षेत्रामधे वृक्षारोपण करण्याचा नवीन संकल्प केला.यावेळी देवराईचे गिरिष खेर,सुकन बाफना,राजेश सरोदे,डॉ.रामसिंग एस रावत,नवीन म्हाळस्कर,भरत पडवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी देवराई संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी गिरीश खेर म्हणाले देवराई संस्था अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असते. यामध्ये दरवर्षी पर्यावरण दिनी / मृग नक्षत्रावर भामचंद्र डोंगर,CRPF टेकडी,घोरवाडी डोंगर इ ठिकाणी बिया फेकून व वृक्षारोपण केले जाते.

Pune News : पिसोळी येथील हार्डवेअर दुकानास पहाटे आग

परिसरातील COD डेपो,CRPF, तालुक्यातील अनेक शाळा याठिकाणी वृक्षारोपण केले जाते तसेच शीतल स्मशान भूमीयोजनेच्या अंतर्गत तालुक्यात,तळेगाव,कान्हे फाटा, इंदोरी,शेलारवाडी,जांबवडे,माळवाडी,जांभुळ,नवलाख उंब्रे,त्याचबरोबर समाजातील विविध मान्यवारच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने देशी वृक्ष लावुन  त्याचे संगोपन करत असते.

याच बरोबर देहू ते पंढरपूर पालखी महामार्गावर पण 8 ठिकाणी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी  झाडे लावुन वारकरी बांधवासाठी सावलीची सोय केली आहे. भंडारा डोंगर येथे पिंपळ वन निर्माण केले आहे.याशिवाय  नैसर्गिक पाणी स्तोत्र  विकसित करुन गावाची जुनी पाणी साटपा विकसित करते. (Talegaon Dabhade) अनेक शेततळी बांधून शेतक-यांसाठी पाणीसाठा उपलब्द केला जातो. इंदोरी,तळेगाव, शेलारवाडी हया ठिकाणची तलावातील गाळ काढून त्याभोवती,वड,पिंपळ, आंबा,जांभूळ,करंज, सुपारी, कडुलिंब अशा देशी झाडांची लागवड ही केली आहे. तसेच वडेश्वर पठारावर,शिवकालीन तलाव देखील बांधले असल्याची माहिती खेर यांनी यावेळी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.