Talegaon Dabhade : वराळे-नाणोली पुलाचे काम मंजूर; एक महिन्यात कामाला सुरुवात

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील वराळे-नाणोली येथील इंद्रायणी नदीवरील प्रलंबित पुलाच्या कामाला नाबार्डच्या निधीतून मंजुरी मिळाली असून या पुलाच्या कामाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. पुढील एक महिन्याच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी दिली आहे. या कामामुळे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वराळे- नाणोली पुलाचा प्रश्न निकाली निघाला आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पाठपुराव्यामुळे नाबार्डच्या निधीतुन वराळे -नाणोली पुलासाठी 6 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

काल, सोमवारी प्रत्यक्षात त्या कामाची पाहणी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन मराठे, नाणोलीचे सरपंच स्वप्नील शिंदे, उपसरपंच विशाल मराठे, ज्येष्ठ नेते वसंत मराठे, गोविंद मराठे, निलेश दत्तु मराठे, दत्तु रोडाजी मराठे, साईनाथ मराठे, गणपत मराठे, नाबार्डचे अधिकारी पी. बी. दाते व वराळे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच निलेश शिंदे, वराळे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मराठे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कामामुळे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.