Talegaon Dabhade : ऐतिहासिक श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विजय दाभाडे

एमपीसी न्यूज – श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये बैठक पार (Talegaon Dabhade) पडली. बैठकीत श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विजय एकनाथराव दाभाडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासह संपूर्ण कार्यकारणी जाहीर झाली. त्यानंतर नवमी निमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली.

श्री रामनवमीच्या निमित्ताने ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. यामध्ये श्री व सौ. सोनाली संभाजी बबनराव मराठे (लोणावळा) यांच्या हस्ते सकाळी अभिषेक व महापूजा,सकाळी 10.30 ते 12.30 वा. श्रीराम जन्मानिमित्त ह.भ.प. जगताप महाराज यांचे किर्तन व भक्तीमय संगीत,दुपारी 12.30 वा. श्रीराम जन्मसोहळा,दु. 12.30 ते 03.00 वाजता बाळासाहेब भागुजी गायकवाड यांचेकडुन महाप्रसाद,सायं. 5.30  वा. श्रीराम प्रतिमा व पादुकांची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान होणार असून पालखीच्या पुढे दिंडी,बॅन्ड, भजन, ढोल लेझीम,मल्लखांब पथकांच्या भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले (Talegaon Dabhade) आहे.

UPSC Result : यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील 87 पेक्षा अधिक उमेदवार यशस्वी

या बैठकीमध्ये सागर दाभाडे,प्रशांत दाभाडे,स्वप्निल दाभाडे,अक्षय दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित कार्यक्रमासाठी पुढील कार्यकारणी निवडण्यात आली.

उपाध्यक्ष- अक्षय शेलार,ऋषिकेश ठोंबरे
खजिनदार- स्वप्निल दाभाडे
सहखजिनदार- रूपेश गायकवाड, मयुर शिंदे
कार्याध्यक्ष- अक्षय बेदरकर
चिटणीस- केतन दाभाडे,अथर्व ठाकर,
सरचिटणीस- अनिकेत दळवी,सौरभ तापकीर
भांडार प्रमुख- अजय दाभाडे
प्रसिद्धी प्रमुख – आकाश दाभाडे , गौरव तापकीर.

 

Today’s Horoscope 17 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.