Talegaon Dabhade : ‘वर्क फाॅर इक्वालिटी’ सामाजिक संस्थेचा गरजूंना मदतीचा हात

एमपीसी न्यूज – विस्थापित झालेल्या या लोकांना शोधणे व मदत पुरविणे सामाजिक संस्थांना देखील अवघड होत आहे. अशा स्थितीत ‘वर्क फॉर इक्वालिटी’ ही सामाजिक संस्था आपल्या परिने गरजूंना दोन वेळेचे अन्न मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. याकामी ‘सबकी रसोई’ या प्रकल्पाच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे येथील नाचकेंड तयार करणारा समुदाय, देहूफाटा येथील भटका व असंघटीत कामगार तसेच आदिवासी वाड्या वस्त्यांना मदत दिली जात आहे. सोबतच संस्था गरजुंना अन्न धान्य पुरविण्याचे काम देखील करत आहे.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दररोज सरकारच्या विविध योजना शेवटच्या स्तरातील लोकांसाठी जाहीर होत असल्या तरी, प्रत्यक्षात स्थलांतरीत, रस्त्यावरील, पालावरील भटक्या जाती जमातीतील लोकांची स्थिती अत्यंत बिकट आहे.

या समाजातील अधिकाधिक लोकांकडे कोणत्याही स्वरुपाचे ठोस कागदपत्र नाहीत. त्यामुळे त्यांना येणाऱ्या सुविधांचा कसा लाभ घेता येईल, यावर अधिक सखोल विचार करणे गरजेचे आहे. मुळातच गावकुसाबाहेरील हा समाज मुख्य प्रवाहातील लोकांना नकोसा असतांना कोरोनामुळे भटक्या समाजावर आहे ती जागा सोडून पोटापाण्यासाठी स्थलांतरीत व्हावे लागत आहे.

या कठीण प्रसंगी प्रत्येकाने आपल्यातील माणुसपण जागवून या शेवटच्या स्तरातील लोकांना सन्मानपुर्वक मदत दिली पाहिजे असे आवाहना ‘वर्क फॉर इक्वालिटी’ संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी केली आहे. मदतीसाठी [email protected] या मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.