Talegaon Dabhade : युवा उद्योजक युवराज काकडे यांची इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विकास समितीच्या सदस्यपदी निवड

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विकास समितीच्या सदस्यपदी युवा उद्योजक युवराज बाळासाहेब काकडे यांची निवड करण्यात आली आहे. युवराज काकडे यांनी ऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षण घेतले आहे. आखिल भारतीय सिव्हिल इंजिनिअरींग असोसिएशन बेंगलोरचे ते सन 2016 पासून सदस्य आहेत. तसेच पुणे जिल्हा मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे ते सन 2019 पासून सदस्य आहेत. त्यांच्या निवडीचा संस्थेला फायदा होईल असा विश्वास प्राचार्य डॉ. संभाजी मलगे यांनी व्यक्त केला.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी युवराज काकडे यांना सदस्य पदाच्या निवडीचे पत्र दिले. ही निवड महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 परिनियम 97 नुसार एक मताने करण्यात आली असून भविष्यामध्ये विद्यालयाच्या विकास कामांमध्ये भरीव योगदान द्यावे, असे सुचविण्यात आले आहे. युवराज काकडे यांनी अनेक व्यवसायांमध्ये नावलौकिक मिळविलेला असून त्यांचे निवडीचा निश्चितच संस्थेला फायदा होईल. असे मत प्राचार्य डॉ संभाजी मलगे यांनी व्यक्त केले.

युवराज काकडे यांनी ऑस्ट्रेलिया येथे 2009 – 2010 मध्ये इंजिनिअरींग एमटेक शिक्षण घेतले आहे. आखिल भारतीय सिव्हिल इंजिनिअरींग असोसिएशन बँगलोर 2016 पासून सदस्य आहेत. तर पुणे जिल्ह्या मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन 2019 पासून सदस्य आहेत.
त्यांच्या निवडीमुळे मावळ तालुक्यात कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.