Talegaon : दहावीच्या परीक्षेत मायलेकींची बाजी; आईला 54 टक्के, तर मुलीला 65 टक्के गुण

अर्चना गराडे , असे या अंगणवाडी मदतनीस महिलेलचे तर  सृष्टी गराडे असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. : Mother & dauter bet in the 10th exam; The mother scored 54 per cent, while the daughter scored 65 per cent

एमपीसीन्यूज : शिक्षणाची ओढ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर एका अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेने आपल्या मुलीसह दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. यामध्ये या महिलेला 54  टक्के, तर तिच्या मुलीला 65 टक्के गुण मिळाले आहेत. दरम्यान, माय लेकींनी मिळविलेल्या या यशाचे मावळ तालुक्यात कौतुक होत आहे.

अर्चना गराडे , असे या अंगणवाडी मदतनीस महिलेचे तर  सृष्टी गराडे असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. त्या धामणे ( ता. मावळ ) या गावात राहतात.

गरिब कुटुंबातील अर्चना गराडे यांचे शिक्षण इयत्ता 9 वी पर्यंतच  झाले आहे. त्यांना शिक्षणाची खूप आवड आहे. मात्र, त्यांच्या वडिलांनी त्यांचे लवकरच लग्न करुन दिले.

परंतु, दहावीचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास अर्चना यांना स्वस्त बसू देत नव्हता. धामणे गावात अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी करीत असताना त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

यासाठी त्यांना पतीची खंबीर साथ  मिळाली. त्याचबराेबर परंदवडी शाळेतील शिक्षक रावसाहेब थाेरात यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

दरम्यान, अर्चना यांची मुलगी सृष्टी ही दहावीच्या परीक्षेची तयारी करीत होती. दोघी माय लेकींनी नेटाने अभ्यास केला. अखेर या दोघीही दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. अर्चना यांना 54 टक्के, तर त्यांच्या मुलीला 65 टक्के गुण मिळाले.

अंत्यत सामान्य कुटुंबातील अर्चना यांनी शेती- घर संभाळून तसेच अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी करीत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मिळविलेले हे यश अन्य महिला आणि मुलींना प्रेरणादायी आहे.

दरम्यान, पती, मुलगी आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याने दहावीच्या परीक्षेत यश मिळाले. आता बीएची पदवी मिळवायचा मानस आहे. त्या दृष्टीने तयारी करणार असल्याचे अर्चना गराडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.