Pune: ट्री इनोव्हेटिव्ह व पर्सिस्टंट फाउंडेशन तर्फे बुधवार पेठ आणि परिसराचे निर्जंतुकीकरण

Pune: Disinfection of Budhwar Peth and its surroundings by Tree Innovative and Persistent Foundation झोपडपट्टीतील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी 'प्रकल्प दूत' हा उपक्रम दोन्ही संस्थांच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज – पुण्यातील रेड लाईट एरिया असणारी बुधवार पेठ, शुक्रवार पेठ यातील सर्व भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्थानिक कार्यकर्ते तसेच ट्री इनोव्हेटिव्ह आणि पर्सिस्टंट फाउंडेशनच्या जवळपास चारशे स्वयंसेवकांनी या कामासाठी उत्स्फूर्तपणे योगदान दिले.

झोपडपट्टीतील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ‘प्रकल्प दूत’ हा उपक्रम दोन्ही संस्थांच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत आहे.

या माध्यमातून ट्री इनोव्हेटिव्ह आणि पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पाच प्रभाग आणि 50 पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली.

विविध झोपडपट्ट्यांमधील गल्ली, बोळे, रस्ते, नाले, सार्वजनिक शौचालय इत्यादी ठिकाणी दर दोन दिवसांनी औषध फवारणी करून हा भाग निर्जंतुक करण्यात येत आहे. जवळपास सहा लाख झोपडपट्टी निवासींना या उपक्रमाचा लाभ होऊन कोरोना संक्रमणाचा प्रभाव कमी करण्यास मदत झाली आहे.

पुण्यातील ट्री इनोव्हेंटिव्ह फाउंडेशन आणि पर्सिस्टंट कंपनीच्या सहयोगाने मे महिन्यापासून निर्जंतुकीकरण ‘प्रकल्प दूत’ हा प्रभावी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.