Talegaon News : रोटरी क्लबच्या वतीने नथुभाऊ भेगडे शाळेत टॅबलेट लायब्ररीची उभारणी

एमपीसी न्यूज – ॲप्टीव्ह कंपनीच्या सीएसआर फंडातून नथुभाऊ भेगडे प्राथमिक शाळा क्रमांक एक तळेगांव दाभाडे येथे डिजीटल स्कुल मोहीमेअंतर्गत पहली ते आठवीसाठी टॅबलेट लायब्ररीची उभारणी करण्यात आली.

ॲप्टीव्ह कांम्पोनंटस् ( इं ) प्रा. लि. चाकण, रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे आणि रोटरी पुणे पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.02) या लायब्ररीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल दांडेकर, सचिव अनिश होले, प्रोजेक्ट समन्वयक महेश महाजन, प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चव्हाण, धनंजय मथुरे, अतुल हंम्पे, जयवंत देशपांडे आदी उपस्थित होते.

चित्रा जनागडे यांनी रोटरी क्लब तळेगाव दाभाडेच्या डिजीटल स्कुल संकल्पनेचे कौतुक केले. टॅबलेट लायब्ररी ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणल्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच या प्रकल्पांचे प्रमुख बाळासाहेब चव्हाण व प्रकल्प समन्वयक महेश महाजन यांनी या प्रकल्पासाठी क्लबचे आभिनंदन व कौतुक केले.

तसेच, ॲप्टीव्ह कंपनीचे आभार मानत तळेगावांतील शाळांना भविष्यात शैक्षणीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी इच्छा व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.