Talegaon News : इंदोरीमध्ये आर्थिक आणि डिजिटल साक्षरता जनजागृती कार्यक्रम

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि आर्थिक साक्षरता केंद्र मावळ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इंदोरी येथे आर्थिक आणि डिजिटल साक्षरता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सुमारे 75 ग्रामस्थ व महिलांनी सहभाग घेतला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली अभियान राबविण्यात आले. जिल्हा सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी गुलाबराव खांदवे, इंदोरी शाखेचे विकास अधिकारी सुजित शेरे, शाखा प्रमुख अनिषा माने, बँक अधिकारी अरुण घुले व रोहित भोईटे यांनी महिला बचत गट प्रतिनिधी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

या अभियानात बँकांचे व्यवहारांबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देण्यात आली. खाते उघडणे, रक्कम जमा व काढणे यांच्या स्लिप भरणे, कर्ज प्रकार व कर्ज फॉर्म भरणे, वैयक्तिक खाते, संयुक्त खाते, सह्याबाबतचा सावधपणा, मुदत ठेव, आदी विषयांची माहिती देण्यात आली. शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी संजय ढोरे, सुनील गाडे, गणेश गाडे, दशरथ ढोरे, मनिषा शेवकर, शिरीन मुलाणी, पोपट काळडोके यांनी चर्चेत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.