Talegaon News : तळेगाव लायन्स क्लबच्या वतीने पत्रकार विलास भेगडे, जगन्नाथ काळे यांचा कोरोना योद्धा  म्हणून गौरव!

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात विशेष कार्य केल्याबद्दल लोकमतचे पत्रकार विलास भेगडे, पुढारीचे पत्रकार जगन्नाथ काळे यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून तळेगाव लायन्स क्लबच्या वतीने गौरव करण्यात आला.

प्रांतपाल सी. ए. अभय शास्त्री, माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा, क्लबच्या अध्यक्षा प्रमिला वाळुंज यांच्या हस्ते  भेगडे आणि काळे यांना गौरविण्यात आले.

हा समारंभ लायन्स क्लब विवेकानंद हॉल या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी सचिव अनिल तानकर, खजिनदार गौरव  शाह, रिजन चेअरमन मुरलीधर साठे, झोन चेअरमन गिरीष पारख, अनुराधा शास्त्री, राजश्री शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. दीपक शहा म्हणाले, “तळेगाव लायन्स क्लबची स्थापना 27 मार्च 1971 रोजी झाली असून येत्या 27 मार्च रोजी क्लब सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्त कायमस्वरूपी मोठे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यासाठी क्लबमधील अनेक दानशूर व्यक्ती  पुढे आल्या आहेत.

तळेगाव लिओ क्लबनेही कोरोना काळात   उपक्रम राबविण्यात चांगले सहकार्य केले आहे. लिओ अध्यक्ष क्रांती वाळुंज, शुभम वाळुंज, सुमीत जैन यांनीही उत्तम काम केले आहे.”

अनिता बाळसराफ आणि  सीमा  जैन यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. लिओ सेजल ओसवाल हिने डिस्ट्रिक्टचा लोगो रांगोळीच्या सहाय्याने उत्कृष्ट रेखाटल्या बद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. शाळीग्राम भंडारी, महेश शाह, मकरंद बापट, शैलेश शाह, ॲड नंदकुमार काळोखे, ॲड मनोहर दाभाडे, शरद बकरे, प्रशांत शहा, संदीप काकडे, यशवंत पाटील, भरत पोतदार, शेखर चौधरी, दिनेश कुलकर्णी, ॲड श्रीराम कुबेर, सुनील वाळुंज, राधेश्याम भंडारी, दीपक  बाळसराफ, अनिता बाळसराफ, अमृता कुलकर्णी, अमीन वाडीवाला, दिगंबर ढोकले आदी उपस्थित होते.

प्रांतपाल  सी. ए.अभय शास्त्री म्हणाले, “तळेगाव लायन्स क्लबने कोरोनाचा  वाढता  प्रादुर्भावरोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीतून कोरोना कालावधीत विविध उपक्रम राबविले. त्यात सातत्य राखले. याचा फायदा तळागाळातील नागरिकांना झाला.

क्लबच्या अध्यक्षा प्रमिला वाळुंज आणि क्लबचे हे कार्य कौतुकास्पद आहे.”

यावेळी डॉ. शाळीग्राम भंडारी, शैलेश शाह,नंदकुमार काळोखे, मनोहर दाभाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. संदीप काकडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

मान्यवरांच्या हस्ते नवीन समर्थ विद्यालयातील  तीस गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. मकरंद बापट यांनी दहा होतकरू  आणि गरजू मुलींची शालेय फी दिली.

कार्यक्रमाचे नियोजन राजश्री शहा, सौजन्या  बकरे यांनी केले. दिनेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.  सौजन्या बकरे यांनी आभार  मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.