Talegaon News : महिलांमधील उपजत गुणांचा उपयोग त्यांनी उपलब्ध संधींसाठी करावा – उद्योजिका अनुपमा खांडगे 

एमपीसी न्यूज – महिलांमध्ये व्यवस्थापन व नियोजन हे गुण उपजत असून, त्याचा उपयोग महिलांनी आपल्याला उपलब्ध होत असलेल्या संधी साठी करावा, असे प्रतिपादन उद्योजिका अनुपमा गणेश खांडगे यांनी केले.

मेधावीन फाउंडेशन आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असलेल्या प्रशिक्षण शिबीराच्या प्रमुख पाहुण्या म्हणून खांडगे बोलत होत्या.

अध्यक्ष स्थानी लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा लायन्स प्रमिला सुनील वाळुंज होत्या, तर या प्रशिक्षणाचे उद्घाटन उद्योजिका राजश्री राजेश म्हस्के यांनी केले तर प्रमुख पाहुण्या म्हणून रोहिणी नंदकुमार शेलार उपस्थित होत्या.

व्यासपीठावर विद्यमान नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके,माजी नगराध्यक्षा माया भेगडे,पत्रकार सोनबा गोपाळे गुरुजी व प्रशिक्षक मंगेश माने सर उपस्थित होते.

महिलांनी स्वावलंबी झाले पाहिजे, विकसित झाले पाहिजे या भावनेतून मेधावीन फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली दाभाडे यांनी व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे.

प्रास्ताविक वैशाली दाभाडे यांनी केले तर सूत्रसंचालन निशा पवार व स्वाती दाभाडे यांनी केले व आभार ज्योती शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.