Pune News : ग्रामपंचायत निवडणूक जिंकलेल्या पतीची पत्नीने खांद्यावरून मिरवणूक काढली

एमपीसी न्यूज – सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्सुकता होती त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांचे त्या निकालाकडे लक्ष लागले होते.. निकाल लागले आणि त्यानंतर सुरु झाला एकच जल्लोष.. तसेच घरोघरी आपापल्यापरीने आनंदोत्सव साजरा करत होते.. गुलाल उधळला जात होता.. पुणे जिल्ह्यातील पाळू ग्रामपंचायत मध्ये पतीने विजय मिळवल्यानंतर आनंदी झालेल्या पत्नीने पतींना खांद्यावर उचलून घेत त्यांची गावभर मिरवणूक काढली. या सर्व प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

खेड तालुक्यातील पाळू गावात जाखमाता देवी ग्रामविकास पॅनल सातपैकी 6 जागांवर वर्चस्व मिळवले.. या विषयात मोठा वाटा होता तो गावातील महिलांचा. त्यामुळे आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना गावातील विजयी उमेदवारांचा पत्नीने पतीला खांद्यावर उचलून घेत त्याची मिरवणूक काढली. संतोष शंकर गुरव धनु 221 मत मिळवत विरोधातल्या उमेदवाराचा पराभव केलाय. आनंदाच्या भरात पत्नी रेणुकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत त्यांची गावभर मिरवणूक काढली..

सध्या त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये चांगलेच व्हायरल होत आहे. अनेकांनी पत्नीच्या खमकेपणा कौतुक करताना संतोष गुरव यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1