Talegaon News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे रोटरी फेस्टचे आयोजन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या (Talegaon News) वतीने सुशिला मंगल कार्यालय येथे दिनांक 17 व 18 जून रोजी ‘रोटरी फेस्ट’चे  आयोजन करण्यात आले. यावेळी देशी गाई यांच्यावर आधारीत पंचगव्य, सेंद्रीय विषमुक्त अन्न, आयुर्वेदिक औषधे, लाकडी घाण्याचे तेल, यंत्र, अग्निहोत्र, देशी बियाणे यांच्या उत्पादनांचे पन्नासहून अधिक स्टॉल्स, लावण्यात आले होते. हे सर्व स्टॉल्स रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने विनामूल्य होते. तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हेही नाममात्र शुल्क घेवून देण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पावनेश्ववरी होत्या तर अशोक काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. रोटरी सभासदांच्या देणगीतून आणि स्वकष्टातून हा उपक्रम राबवला गेला. अशोक काळोखे यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले की, अशा समाजोपयोगी उपक्रमांना आम्ही नेहमीच मदत करत राहू.

Ashadh : ओळख मराठी महिन्यांची – भाग 4 – व्रतवैकल्यांनी युक्त आषाढ महिना

या फेस्टमध्ये पन्नासहून अधिक विक्रेत्यांनी भाग घेतला आणि दोन हजारहून अधिक ग्राहकांनी या प्रदर्शनास भेट दिली. ह्या प्रदर्शनामध्ये सेंद्रीय आणि आयुर्वेदावर आधारित उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला. असे अध्यक्ष अनिश होले यांनी सांगितले. देशी गायीच्या (Talegaon News) उत्पादनांचा वापर रोजच्या जीवनात केल्यास उत्तम आरोग्य प्राप्त होते. त्यासाठी अशा उत्पादनांशी सर्वांचा परिचित होणे आवश्यक आहे, असे प्रकल्प प्रमुख डाॅ. ज्योती मुंडर्गी यांनी सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडेचे अध्यक्ष अनिश होले यांनी पुढाकार घेतला. त्यामध्ये विश्वनाथ मराठे, भालचंद्र लेले, महेश महाजन,राजू गोडबोले,राजन आम्रे,थनंजय मथुरे, ऋषिकेश कुलकर्णी, प्रसाद मुंगी, अतुल हंपे या रोटेरियन्सची खूप मदत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.