Talegaon News : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे मंगळवार दिनांक 26.1.2021 रोजी 72 वा प्रजासत्ताक दिन मान्यवर व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे उपस्थित होते तसेच उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, खजिनदार सुदाम दाभाडे, संचालक विलास काळोखे, रामराव जगदाळे, सूर्यकांत ओसवाल,सल्लागार दीपक बिचे, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या शालेय समिती अध्यक्षा व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्षा जयश्री जोशी तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे सेक्रेटरी सचिन कोळवणकर, उपाध्यक्ष विल्सन सालेर, राहुल खळदे, माजी अध्यक्ष शंकर हदिमनी, रो. प्रवीण भोसले, संचालक रो.प्रवीण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे संतोष खांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्रगीत व ध्वज गीताचे गायन करून भारत मातेचा जयघोष झाला. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींद्वारे देशभक्तीपर समूहगीताचे गायन केले गेले.

कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांचा स्वागतपर सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कार्यक्रमास उपस्थित स्वामी विवेकानंद स्कूल च्या शालेय समिती अध्यक्षा व रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांचा स्वागत पर सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी केला. कोरोनाविषाणू संक्रमणामुळे विद्यार्थी उपस्थित नव्हते. त्यांच्यासाठी ऑनलाइन कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली

यावेळी संतोष खांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची सुरुवात विद्यार्थ्यांपासून करायला हवी या दृष्टिकोनातून शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच सध्याची जागतिक समस्या म्हणजे कोरोनाविषाणू यांच्याशी लढा देण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे कशाप्रकारे लक्ष द्यावे याचे मार्गदर्शन केले व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10 वी तील विद्यार्थिनी गायत्री माने हिने केले. शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले. खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.