Talegaon News : कारला ट्रक घासला म्हणून ट्रक चालकास लुटले

एमपीसी न्यूज – कारला ट्रक घासला म्हणून कारमधील (Talegaon News) दोघांनी ट्रक चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मोबाईल फोन रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना सोमवारी (दि.6) रात्री साडेआठ वाजता तळेगाव-चाकण रोडवर मच्छी मार्केट समोर घडली.

मुकेश रामनाथ यादव (वय 45, रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/एचडब्ल्यू 2070 या कारवरील चालक आणि त्याचा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : रिल्स बनविण्याच्या नादात तरुणांनी दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ट्रक मधील माल मोशी येथील गोडाऊन मध्ये खाली करून पनवेलकडे जात होते. चाकण-तळेगाव रोडने जात असताना तळेगाव येथील मच्छी मार्केट समोर आल्यानंतर त्यांच्या ट्रकला डाव्या बाजूने एक कार घासली. त्यावरून कार चालकाने फिर्यादीचा ट्रक थांबवून त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करून मारहाण केली. कार चालकाच्या साथीदाराने फिर्यादीचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम (Talegaon News) जबरदस्तीने काढून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.