Talegaon : तळेगावात पोलिसांनी काढली किटक टोळीची धिंड 

एमपीसी न्यूज – भरदिवसा गोंधळ (Talegaon) घालत दहशत निर्माण  करणाऱ्या किटक टोळीला पोलिसांनी अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने किटक टोळीतील गुन्हेगारांची तळेगाव दाभाडे येथे धिंड काढली.

किटक उर्फ जय प्रवीण भालेराव (वय 19), वैभव राजाराम विटे (वय 25, दोघेही रा. तळेगाव दाभाडे), विशाल शिवाजी गुंजाळ (वय 20, रा. वराळे), प्रदीप वाघमारे (वय 20, रा. वडगाव), रुतिक मेटकरी (वय 20, रा. देहूरोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एका महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. 24) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किटक याने साथीदारांसह तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा मुलींची नावे घेऊन गल्लीमध्ये आरडाओरडा केला. फिर्यादी महिलेला मारहाण करून विनयभंग केला. महिलेच्या दीराला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. लोकांना धमकावून दहशत केली.

 

Pune : पीएमपीएमएलच्या 7 व्या पर्यटन बससेवेचा शुभारंभ

गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने आरोपींचा माग काढून अटक केली. गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना घटनास्थळी नेले. आरोपींची धिंड काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

किटक टोळीचा प्रमुख असलेला किटक भालेराव याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोडा, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करून धमकी देणे व दहशत निर्माण करणे असे 10 गुन्हे दाखल आहेत.

आरोपी वैभव विटे याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सात तर चाकण पोलीस ठाण्यात एक असे आठ विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी विशाल गुंजाळ, प्रदीप वाघमारे आणि रुतिक मेटकरी यांच्यासह विधीसंघर्षित बालकाच्या विरोधात देखील विविध गुन्हे दाखल (Talegaon) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.