Talegaon: ‘स्वररंग 2023’ स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे यश

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Talegaon), विद्यार्थी विकास मंडळ आयोजित “स्वररंग 2023” या स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थिनींनी वाखाणण्याजोगे यश मिळवले.

खडकी येथील टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात या स्पर्धा संपन्न झाल्या.

सुगम संगीत स्पर्धेत धनश्री शिंदे तृतीय, एकपात्री अभिनय स्पर्धेत संचिता हरपुडे तृतीय आणि मेहंदी स्पर्धेत जान्हवी आंबेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला.

Pimpri : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

या विद्यार्थिनींचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांनी विशेष अभिनंदन केले.

विद्यार्थिनींना प्रा. डॉ. विनया केसकर, महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. हेमंत मुजलगेकर (Talegaon) आणि प्रा. सोमनाथ कसबे यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.