Lohgaon : विद्यमान आमदारांनी केवळ नारळ फोडण्याचे काम केले-मुळीक

लोहगाव मधील खड्ड्यात झाडे लावून भाजपने महापालिकेचा केला निषेध

एमपीसी न्यूज – लोहगावात (Lohgaon) खड्डे, वाहतूक कोंडी, पाणी, कचरा हे मूलभूत प्रश्न गंभीर बनले असून त्यामुळे लोहगाव हे समस्याचे गाव म्हणून ओळखले जात आहे. याला विद्यमान आमदार जबाबदार असून त्यांनी केवळ नारळ फोडण्याचे काम लोहगावात केले असल्याची टीका माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केली.

India News : देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी लॅपटॉप, टॅबलेट यांच्या आयातीवर निर्बंध

लोहगाव मधील सर्वच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या विरोधात भाजपच्या वतीने खड्ड्यात झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला. यावेळी मुळीक यांनी वडगावशेरी मतदार संघातील विद्यमान आमदारांवर टीका केली. आंदोलनात सुनील खांदवे-मास्तर, विकास उंद्रे, संतोष राजगुरू, मोहन शिंदे, संदीप मोझे, संतोष खांदवे, बापू खेसे, आदित्य खांदवे, यासह लोहगाव मधील नागरिक उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, लोहगाव मधील नागरिक कर महापालिकेला देतात. पण तशा सुविधा महापालिकेकडून मिळत नाहीत. सोयी- सुविधा मिळविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. मी आमदार असतानाच्या काळात एका दिवशी 27 विकास कामांचे उदघाटन केले आणि कामे देखील पूर्ण केली.

आताचे आमदार तर महापालिकेच्या कामांचे श्रेय घेऊन नुसतेच नारळ फोडत आहेत. बोर्ड लावून जाहिरात बाजी करत श्रेय घेत आहेत. मात्र जागेवर काहीच कामे झाली नसल्याची टीका मुळीक यांनी केली. यावेळी सुनील खांदवे मास्तर यांनी देखील लोहगाव मध्ये वाढलेल्या समस्यांना विद्यमान आमदार जबाबदार असून आपण केलेल्या आंदोलनाचे श्रेय आपल्याला मिळू नये म्हणून त्यानी आंदोलन केल्यामुळे सर्व प्रश्न सुटत असल्याच्या थापा मारत सर्वत्र फिरत असल्याची टीका केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.