Pune : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची जगदीश मुळीक यांनी शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात घेतली भेट

एमपीसी न्यूज – महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची (Pune)माजी आमदार आणि भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी भेट घेऊन पुणे शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.

 

पुणे शहराचा विकास आराखडा अंमलबजावण्याची सद्यस्थिती आणि पुढील नियोजन गणेश खिंड रस्त्यासह शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाय योजनामुळा मुठा नदी शुद्धीकरण आणि नदी काठ सुशोभीकरण(Pune) सद्यस्थिती नदीपात्र आणि विविध भागातील तलावांमध्ये जलपर्णी वाढल्यामुळे व अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली डासांची समस्या आणि उपाय योजना या विषयांवर चर्चा केली.

Pune : …आता मुरलीधर अण्णा यांचे काय होणार?

यावेळी डासांच्या समस्यांवर एका आठवड्यात उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. शहराच्या विविध भागात डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. नदीची आस्वच्छ्ता आणि वाढत्या जलपर्णीमुळे ही समस्या झाली आहे. खराडी येथील जलपर्णी काढण्याचे काम प्राधान्याने हाती घेणार आहे. तसेच मुला मुठा नदी आणि शहरातील तलावांतील जलपर्णी काढण्याचे काम वेगात करणार आहे. उपस्थित केलेल्या विविध विषयांवर बैठक घेऊन नियोजन करण्याचे आश्वासन दिले.

मुळीक म्हणाले, नुकतेच जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने पुणे व्हिजन ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींनी मार्गदर्शन केले. या परिषदेत पुढील काही विषयांमध्ये तातडीने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आले. त्या विषयांवर भेट झाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.