Pune : मोहोळ, मुळीक पाठोपाठ देवधर यांचीही शक्तीप्रदर्शनाची तयारी

एमपीसी न्यूज – आगामी पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ( Pune ) माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यानुसार आगामी काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.

संपूर्ण देशभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने 40 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवून कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या झालेला पुणे मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

Pimpri : महापालिकेच्या वतीने वीर बाल दिवस साजरा

माजी आमदार जगदीश मुळीक यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेच्या आयोजनातून आपला जनसंपर्क वाढवत मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अटल संस्कृती पुरस्कार देत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यानंतर आता सुनील देवधर यांनी देखील शहरात पुढील दोन महिन्यात मोठ्या कार्यक्रमांचा आयोजन करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सुनील देवधर यांनी पुण्यात बैठक घेतली. भाजपचे जुने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पुण्यात येत्या दोन महिन्यात तीन मोठ्या कार्यक्रमाद्वारे करणार सुनील देवधर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यामध्ये लता मंगेशकर पुरस्कार, राजमाता जिजाऊ जयंती उत्सव आणि मकर संक्रांतीचा कार्यक्रम करून शक्तीप्रदर्शन करणार असल्याने त्यादृष्टीने बैठकीत नियोजन करण्यात आले.

दरम्यान, 2014 आणि 2019 या 10 वर्षांच्या कारकिर्दीत पुणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत अनिल शिरोळे आणि दिवंगत खासदार गिरीश बापट निवडून आले होते. आगामी 2024 च्या पुणे लोकसभा निवडणुकीत भाजप कोणाला उमेदवारी देणार, याकडे लक्ष लागले आहे. तर, बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांचेही नाव उमेदवारीसाठी ( Pune ) चर्चेत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.