Chinchwad News : अग्निशामकच्या कार्यशाळेत तांत्रिक आपत्ती निवारणातील अडचणी, त्यावरील उपाय योजनांवर झाली चर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभाग व फायर रेस्क्यू असोसिएशन ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित उंच निवासी वाणिज्य व मिश्र इमारती मधील अग्निशमन व बचाव उपायोजना याबाबत परिसंवाद कार्यशाळेत तांत्रिक आपत्ती निवारणातील अडचणी, त्यावरील उपाय योजनांवर सखोल चर्चा झाली.

ऑटो क्लस्टर चिंचवड येथे झालेल्या कार्यशाळेत महापालिका अग्निशामक विभाग आणि एफ एस ए आय यांच्याकडून तांत्रिक विषयावर सादरीकरण तसेच संबंधित क्षेत्रातील विशेषज्ञ यांचे चर्चासत्र पार पडले. उंच इमारतीतील बांधण्याचे विविध नियम निकष कायदे प्रत्यक्षातील तांत्रिक आपत्ती निवारणातील अडचणी आणि त्यावरील उपाय योजना याविषयी सखोल चर्चा करण्यात आली.

या परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, राष्ट्रीय हरित लवादचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवाचे संचालक संतोष वारीक याच्या हस्ते पार पडले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे, एफएसआय संस्थेचे पुणे चॅप्टरचे अध्यक्ष नितीन जोशी, राष्ट्रीय अध्यक्ष अजित राघवन, सेक्रेटरी अर्चना गव्हाणे आणि त्यांचे सहकारी, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

केशर टी टाऊन गृहरचना संस्था येथील इमारतीमध्ये 11 ऑगस्ट 2021 रोजी लागलेल्या आग दुर्घटना मध्ये या निवासी संस्थेने त्यांच्याकडील बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत राखून प्रत्यक्षात त्याचा वापर करून आग विझवली. याबद्दल संस्थेचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 28 ऑगस्ट 2021 रोजी दापोडी येथे जुने घर कोसळून त्याखाली अडकलेल्या मुलीला आपला जीव धोक्यात घालून प्राण पणाला घालून तिचे जीव वाचविल्याबद्दल चेतन माने आणि लक्ष्मण होवाळे फायरमन यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा आणि अग्निशमन सेवेत प्रदीर्घ उल्लेखनीय कामगिरी बजाविल्याबद्दल राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आलेले मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांचादेखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यात प्रथमच पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक विभागामध्ये दाखल झालेले 12 माहिती महिला शिक्षू उमेदवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी बॉनटॉन केबल्स, स्वस्तिक सिनर्जी, तुलसी फायर, टेस्टो इंडिया, कॅविटाक मार्केटिंग आणि विघ्नहर्ता यांचे प्रायोजक म्हणून तसेच इशरे पुणे, मेपा आणि बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे सहकार्य होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.