Aalandi : दुचाकीचा धक्का लागल्यावरून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाताना एका दुचाकींचा दुस-या दुचाकीला धक्का लागला. या रागातून चौघांनी मिळून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नगरपरिषदेच्या पार्किंगमध्ये घडली.
गणपत सोपानराव पोळ (वय 36, रा. उंबरी, जि. बीड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वयंभू मल्हार काळे आणि अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत नगरपरिषदेच्या पार्किंगमधून त्यांची दुकाची काढत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्याची मेहुणी होती. गाडी काढत असताना त्यांच्या दुचाकींचा धक्का काळे यांच्या दुचाकीला लागला. यावरून पोळ आणि काळे यांच्यात वाद झाला. काळे आणि त्यांच्या साथीदारांनी जबरदस्तीने पोळ यांच्या खिशातून पाच हजार रुपये आणि त्यांच्या मेहुणीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'8804196d6c182b2d',t:'MTcxNTExNTIwNi41OTgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();