Pune : गौरी लंकेश यांची हत्या सचिन अंदुरेच्या जप्त पिस्तुलातूनच ! ; सीबीआयचा दावा

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातूनच झाल्याचा खळबळजनक दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.

सदरचे पिस्तुल सचिनच्या मेहुण्याकडून जप्त करण्यात आले होते. सचिन अंदुरेला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सीबीआयने हा दावा करत सचिन अंदुरेच्या कोठडीची मागणी केली. त्यानुसार सचिनला 30 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असे तपासात पुढे आले आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरेने हत्येचा कट रचला होता, असा दावा सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.