Kasarwadi News : मेडिकल शॉपला आग, शेजारी होता विद्युत ट्रान्सफॉर्मर; टळली मोठी दुर्घटना

एमपीसी न्यूज – कासारवाडीतील मेडिकल शॉपला आज (शुक्रवारी) आग लागली होती. मेडिकल शॉपच्या बाजूला विद्युत ट्रान्सफॉर्मर होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.

कासारवाडीतील पिंपळे अपार्टमेंटमध्ये मेडिकल शॉप आहे. सकाळी सव्वानऊच्या सुमारास हे शॉप उघडले होते. शॉप उघडल्यानंतर अचानक आग लागली. आगीमुळे धुराचे लोट येत होते. संत तुकारामगर येथील अग्निशमक दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी काही मिनिटांमध्ये आग विझविली. दरम्यान, मेडिकलच्या बाजुला किराणा दुकान होते. जवळच विद्युत ट्रान्सफॉर्मर देखील होता. वेळीच आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. यापूर्वी देखील आगाची घटना घडली होती. त्यामुळे आग कशामुळे लागली याचे तपास करावा, अशी मागणी कासारवाडी सिटीझन फोरमचे मनोज मोरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.