Wakad : मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प वाकडच्या शाळेत सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पुढाकाराने सीएसआर निधीच्या माध्यमातून वाकड येथील आबजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे, नगरसेविका रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर, सदस्या शारदा सोनवणे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव यांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम सुरु केल्याबाबत आनंद व्यक्त केला. सीएसआरच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रकल्प ‘महिला सबली करणच्या’ दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे. महापालिकेच्या वतीने अशा प्रकल्पाला पूर्ण सहकार्य केले जाईल. त्याचा लाभ अधिकाधिक मुलींपर्यत कसा पोहचवतात येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आपले सर्वांचे कर्त्तव्य आहे.

सोनाली गव्हाणे यांनी सांगितले की, ‘आजच्या सामाजिक परिस्थितीत महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या साठीचे ‘शाररिक आणि मानसिक’ सबली करणाची आवश्यकता आहे. त्याचे शिक्षण लहानपणा पासूनच होणे आवश्यक आहे. नवरात्र महोत्सव साजरा करीत असताना आपण आपल्या आदिमातांकडून ही शिकवण व प्रेरणा घेणे आवश्यक आहे. हा विचार डोळयासमोर ठेऊनच निर्भया प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ‘उर्मि’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या भूमकर व वाकड या ठिकाणच्या शाळेत हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका मुलींच्या शाळेत याचा विस्तार करण्यात येईल’. प्रशासनाच्या वतीने या प्रकल्पाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.