Kalewadi : रहाटणी-काळेवाडीतील ड्रेनेज लाईनच्या खोदाईचा नागरिकांना त्रास

एमपीसी न्यूज – रहाटणी-काळेवाडीतील आदिनाथ कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईनचे दुरुस्तीकाम सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी केली आहे.

यासंदर्भात दाखले यांनी ग प्रभाग अधिकारी स्मिता झगडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून आपल्या स्थापत्य (ड्रिनेज दुरूस्ती विभागाकडुन) श्रीनगरमधील आदिनाथ कॉलनीमध्ये ड्रिनेज दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु, या ठिकाणावरील कामाच्या दिरंगाईमुळे कॉलनीतील महिला, ज्येष्ठ नागरीक व शालेय विद्यार्थीं यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपण स्वतः दखल घेऊन कर्मचा-यांना दुरूस्ती आदेश द्यावेत, अन्यथा शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने सदरील खड्यात वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेईल, असा इशारा दाखले यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.