Pune : कचरा निर्मूलनाचा प्रश्न लवकरच मिटविला जाईल – महापौर

एमपीसी न्यूज – फुरसुंगी येथील उरुळी कचरा डेपो संदर्भातील कचरा निर्मूलनाचा प्रश्न नजीकच्या काळात कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करून निकालात काढला जाईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

शहराच्या विविध भागात कार्यरत असलेल्या कचरा निर्मूलन प्रक्रिया ठेकेदार कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी, मनपा प्रशासन यांची संयुक्त बैठक महापौर यांचे अध्यक्षतेखाली सोमवारी झाली.

प्रभावी नियोजन करून नजीकच्या काळात कचरा निर्मूलनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याकरिता एकत्रितपणे यशस्वी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याच कारणास्तव बैठकीचे आयोजन केल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) शान्तनू गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक व अन्य अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालण्याकरिता सद्यस्थितीमधील अडचणी, प्रकल्पात वाढ करणे, तांत्रिक अडचणी संदर्भात चर्चा करणे, मान्यतेसाठी जलदगतीने कार्यवाही करणेकरिता सर्वांनी प्रभावी नियोजन करून अंमलबजावणी करावी, असे शंतनू गोयल म्हणाले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी प्रास्ताविक स्वरूपात सद्यस्थिती बाबत सविस्तर माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.