Chinchwad : चिंचवडला क्रांतीदिनानिमित्त क्रांतीफेरी

एमपीसी न्यूज – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी प्राथमिक विद्यामंदिर येथे क्रांतीदिन उत्साहात झाला.

चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमाला माजी सैनिक व बॉम्ब शोधक पथक पोलीस निरिक्षक महादेव तोंदळे, पोलीस अधिकारी अरुण वाल्हे आदी उपस्थित होते. यावेळी बॉम्ब शोधक पथक पोलीस निरिक्षक महादेव तोंदळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच बेवारस वस्तूंबाबत घ्यावयाची काळजी, बॉम्ब नाशक प्रात्यक्षिके सादर केली.
तत्पूर्वी क्रांतीकारकांना अभिवादन म्हणून क्रांतीकारकांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची क्रांतीफेरी काढण्यात आली. देशभक्तीपर गीते यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केली.

वर्षा काटकर, शिवशंकर शिनगाडे, अॅड. राजेंद्रकुमार मुथास अनिल कुमार कांकरिया यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.