Pune : नोकरी देण्याच्या अमिषाने 8 लाखाला गंडा

एमपीसी न्युज – ऑनलाइनच्या माध्यमातून अज्ञात इसमानी नरेश नायडू ( वय 32, पुणे) यांना सिंगापूर येथे नोकरीस पाठवण्याचे आमिष दाखवून त्यांना एकूण 8 लाख 19 हजार 500 एवढी रक्कम 14  डिसेंबर 2017 ते 31 जानेवारी 2018
या दरम्यान वेळोवेळी ऑनलाइन पेमेंट द्वारे भरण्यास लावून त्यांची फसवणूक केली.

नरेश नायडू( वय 32, पुणे) यांना काही अज्ञात बँकेचे खातेधारक व मोबाईलदधारकानी फोन करून नरेश यांना आम्ही तुम्हाला सिंगापूर येथे नोकरीला पाठवतो व तुम्हाला महिन्याला उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवून त्यांना 14 डिसेंबर 2017 ते 31 जानेवारी 2018 या दरम्यान ऑनलाइन पेमेंट द्वारे वेळोवेळी बँकेच्या खात्यावर एकूण 8 लाख 19 हजार 500 रुपये भरण्यास
सांगितले होते. परंतु अजूनपर्यंत नरेश यांना कोणतीही नोकरी व उत्पन्न न देता त्यांची फसवणूक केली गेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.