Pimpri : पीसीसीओईमध्ये गुरुवारी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

एमपीसी  न्यूज –   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) गुरुवारी (दि. 16 ऑगस्ट) ‘कम्प्युटींग, कम्युनिकेशन, कंट्रोल  या विषयांवर आयईईई या संस्थेच्या पुणे विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक डॉ. स्वाती शिंदे व डॉ. अनुराधा ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
     

आण्णा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व ईबीजी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. ई. बालगुरु स्वामी यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी नॅनोमिशनचे व नॅशनल सुपर कम्प्युटींगचे प्रमुख डॉ. मिलींद कुलकर्णी, आयईईई पुणे सेक्शनचे दिनानाथ खोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य अ.म.फुलंबरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयईईई पुणे यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या परिषदेत भारतासह तुर्की, ऑस्ट्रेलिया, फिलीपाईन्स्‌, पोर्तुगाल, फ्रान्स देशातील अभियंते प्रतिनिधी आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. तसेच भारतातील डीआरडीओ, सीआयएससीओ, रिलायन्स्‌, एनआयटी, व्हीआयटी, एसआरएम आदी कंपन्यांचे प्रतिनिधी आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. या परिषदेचा समारोप शनिवारी (दि. 18 ऑगस्ट) आत्रेय इनोव्हेशन्सचे संस्थापक डॉ. अनिरुध्द जोशी यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.