Pune Crime News : लग्नासाठी नकार देणाऱ्या अल्पवयीन प्रेयसीचा गळा चिरला

एमपीसी न्यूज – लग्नासाठी नकार देणाऱ्या एका अल्पवयीन प्रेयसीचा प्रियकराने गळा चिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे हा प्रकार घडला. पुणे सोलापुर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात प्रियकराने प्रेयसीला ठार  (Pune Crime News)  मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी राहुल श्रीशैल निरजे (वय 27) याला स्थानीक नागरिकांच्या सतर्कतेने ताब्यात घेण्यात आले असून युवती गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे. जखमी युवतीला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Blood Donation : रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 100 जणांनी केले रक्तदान

 

अधिक माहिती अशी की, आरोपी राहुलचे पीडित तरुणीवर प्रेम होते. तिच्यासोबत लग्न व्हावे यासाठी तो मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत होता. मात्र ही तरुणी त्याला प्रतिसाद देत नव्हती. याच रागातून त्याने मंगळवारी तिला शेतात गाठले आणि तिच्यावर प्राण घातक हल्ला केला. आरोपींनी थेट तिचा गळा चिरत तिला जीवे मारण्याचा (Pune Crime News)  प्रयत्न केला. यामध्ये ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.