Kartiki Yatra : आळंदीमधील लाखो भाविकांच्या सोयी सुविधेकरीता असणाऱ्या दर्शनबारीचे काम अखेर सुरू

एमपीसी न्यूज : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त (Kartiki Yatra) आळंदी मध्ये लाखो भाविक येत असतात. त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रशस्त दर्शनबारीची आवश्यकता भासते. तात्पुरती दर्शनबारीचे काम दि.15 नोव्हेंबर मंगळवार रोजी पासून संबंधित प्रशासनाच्या परवानगीने नदीपलीकडील जागेत सुरु झाले आहे.

सकाळी देवस्थानच्या वतीने तेथील जागा स्वच्छ करून भाविक भक्तांना दर्शनबारीत कुठल्याही प्रकारचा चालताना, उभे राहताना त्रास होऊ नये यासाठी त्या स्वरूपातील काम तिथे चालू केले होते. त्यानंतर दर्शनबारी करिता लागणारे साहित्य आणून दर्शनबारी मंडप उभारण्याचे काम सुरू होते. तिथे काही दिवस अहोरात्र दर्शनबारी उभारण्याचे कार्य करताना कामगार दिसून येणार आहेत. आळंदी कार्तिकी एकादशीला अवघे मोजकेच दिवस उरलेले दिसून येत आहे.

Kartiki Yatra Bus : आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएलकडून गुरुवारपासून धावणार जादा बसेस

एकादशीच्या अगोदर एक दोन दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.त्या अनुषंगाने भाविक वारकरी यांच्या सोयी सुविधेसाठी काम व्यवस्थितपणे करण्यासाठी किमान एकादशीच्या अगोदर दहा ते अकरा दिवस तेथील जागा देवस्थान च्या ताब्यात मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी नोव्हेंबर 10 पर्यंत तरी तेथील जागा देवस्थानच्या ताब्यात मिळावी यासाठी पालिका प्रशासनाने संबंधित प्रशासनास पत्रव्यवहार करावा.असे दि.4 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रसाशन बैठकीत विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी मागणी केली होती.

आषाढी वारी व कार्तिकी यात्रे वेळी लाखो भाविकांसाठी महत्वपूर्ण असणारी दर्शनमंडपाची/दर्शनबारी जागेची कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता येथील दर्शन मंडप आरक्षण उठवले गेल्याने त्यानंतर प्रकरण न्यायालयीन झाल्याने (करोना कालावधी सोडून) दरवेळी आषाढी कार्तिकी वेळी संबधीत प्रशासनास पत्रव्यवहार करून येथील जागेत दर्शनबारी उभारण्या करता त्या प्रशासनाच्या लेखी परवानगी आदेशाची गरज पडत आहे. येथील दर्शन मंडप जागा मिळावी या संदर्भात उच्च न्यायालयात देवस्थान व डी डी भोसले पा. यांनी याचिका दाखल केली आहे.नदीपलीकडील या जागेत दर्शनबारी मंडप कधी उभारतात? याकडे सर्व आळंदीकरांचे लक्ष लागले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.