Bhosri : पूर्ववैमानस्यातून तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – दुचाकी वरून जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कासारवाडी येथील सितांगण गार्डनच्या समोरील रस्त्यावर घडली.

Akurdi : माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे सहकारमध्ये उल्लेखनीय काम –  इरफान सय्यद

सार्थक सुरेश कांबळे (वय 19, रा. कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी (Bhosri)पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चैतन्य शिंदे (वय 19, रा. गुरव पिंपळे) आणि त्याचा मित्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सार्थक हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. मागील चार महिन्यांपूर्वी सार्थक यांच्यासोबत झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले. त्यानंतर शिवीगाळ करत हॉकी स्टिकने बेदम मारहाण करत त्यांना जखमी केले. मारहाण केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी (Bhosri) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.