Thergaon News : थेरगावमध्ये मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज : चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत (Thergaon News) निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली थेरगाव फाटा ते तापकीर चौक दरम्यान मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीत थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी (Thergaon News) सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून नागरीकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.

Pune News : कलाकारांसोबतच पडद्यामागची प्रत्येक व्यक्ती देखील महत्त्वाची – चैतन्य ताम्हाणे

यावेळी या रॅलीमध्ये निवडणूक नायब तहसिलदार श्वेता आल्हाट, विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड, क्रीडा शिक्षक हनुमंत सुतार, बाळाराम शिंदे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.