Thergaon : पिंपरी-चिंचवड शहर मुस्लिम समाजतर्फे इफ्तार पार्टी उत्साहात

एमपीसी न्यूज- मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर मुस्लिम समाज यांच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली.

थेरगाव डांगे चौक येथील अन्सार मस्जिद येथे सोमवारी (दि. 3) सायंकाळी इफ्तार पार्टी झाली. यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेवक सचिन भोसले, विश्वजीत बारणे, संतोष बारणे, सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर मनियार, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश माने, हरीश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

इरफान सय्यद म्हणाले, ”सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे”. यांनी सय्यद यांनी मुस्लीम बांधवांना रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजन मौलाना अलीम अन्सारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.