Thergaon : 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीला विजेतेपद

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या 14 वर्ष खालील व्हेरॉक चषक क्रिकेट (Thergaon) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीने आर्यन्स क्रिकेट अकॅडमीवर 3 गड्यांनी विजय मिळवत व्हेरॉक चषक आपल्या नावे केले आहे. या सामन्यात प्रज्वल मोरे 50 आणि रुहुल्ला आडफ 57 यांनी अर्धशतकी खेळी करत आर्यन्स अकॅडमीने दिलेले 193 धावांचे लक्ष्य गाठले.

प्रथम फलंदाजी करतांना आर्यन्स अकॅडमी ने 45 षटकांत 5 गड्यांच्या मोबालद्यात 194 धावा केल्या. यामध्ये एकनाथ देवडे 56. अर्णव पाटील29, प्रद्युमन कोळी23, भव्य वडोदरीया 37 यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. सुबोध दैठणकर 2 आणि वीरेन मिरजे याने 1 बळी मिळवले.

प्रत्युत्तरात व्हेरॉकच्या प्रज्वल मोरे 50 आणि रुहुल्ला आडफ 57 यांनी केलेल्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर हे लक्ष्य 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या वेंगसरकर अकॅडमीचा प्रज्वल मोरे हा सामनावीर ठरला. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज आर्यन्स अकॅडमीचा एकनाथ देवडे, तर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज आर्यन्स अकॅडमीचा आधान प्रसाद स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक वेंगसरकर अकॅडमीचा प्रज्वल मोरे आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूआर्यन्स अकॅडमीचा एकनाथ देवडे हे खेळाडू ठरले. या सामन्यात पंच म्हणून विकास चौधरी आणि भाऊसाहेब दंगे यांनी भूमिका बजावली.

Akurdi : दिव्यांग बांधवांमध्ये प्रकाशवाटा पेरण्यासाठी साद सोशल फाउंडेशन कटिबद्ध – इरफान सय्यद

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राचे माजी रणजीपटू आणि निवड समिती सदस्य श्रीकांत काटे ह्यांच्या हस्ते झाले. राहुल (Thergaon) वेंगसरकर ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे श्रीकांत काटे खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले की, युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधांसह व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे महाराष्ट्राच्या यशात मोठे योगदान आहे.

खेळाडूंनी देखील वेंगसरकर ह्यांना अपेक्षित असलेली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. ह्यावेळी अकॅडमीचे प्रशिक्षक मोहन जाधव, शादाब शेख, चंदन गंगावणे, भूषण सूर्यवंशी, राहुल वेंगसरकर, प्रमोद लिमण आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते.

सूत्रसंचालन डॉ .विजय पाटील ह्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.