Chinchwad : उद्योजक रमेश चौधरी यांना आयसीएआयचा पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – सामाजिक, योगा आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चिंचवड येथील सुर्या (Chinchwad ) इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक रमेश चौधरी यांना बेस्ट बिझनेस लीडर ॲवार्ड देवून सन्मानित करण्यात आले. 

दि इंस्टीट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया(आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या “ज्ञान तृष्णा” या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रेरणा वक्ते बलविंदरसिंग चांडीओक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी दि इंस्टीट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया पिंपरी- चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए सचिन बंसल, उपाध्यक्ष सीए पंकज पाटणी, सचिव सीए सारिका चोरडिया, खजिनदार शैलेश बोरे, सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष सीए वैभव मोदी,  माजी अध्यक्ष विजयकुमार बामणे, कार्यकारी सदस्य सचिन ढेरंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Thergaon : 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीला विजेतेपद

चौधरी यांचा एक हेल्पर ते उद्योजक असा खडतर प्रवास आहे. आज त्यांचे सुर्या इलेक्ट्रॉनिक नावाने पुणे जिल्ह्यात 11 दालने (Chinchwad ) जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.आज 200 कामगारांच्या हाताला काम दिले. सामाजिक कार्यात सहभागी होतात. त्यासोबत सामाजिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगासनांचे देखील ते व्याख्याने देतात.

निष्ठेने ग्राहकसेवा, ऑनलाईनपेक्षा स्वस्त उपकरणे उपलब्ध करून देणे आणि पारदर्शक व्यवहार, हे आमचे वैशिष्ट्य आहे. सुर्या जनतेच्या प्रेमातून घडलेला ब्रॅंड असल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.