Pune :  तरच भारतीय शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळेल – डॉ. संजय ढोले

एमपीसी न्यूज – “मूलभूत विज्ञानातील (Pune ) संशोधनामध्ये आपण मागे पडतो. शिवाय, झालेल्या संशोधनाचा योग्य प्रचार व प्रसार होत नाही. त्यामुळे गुणवत्ता असूनही नोबेल पारितोषिक भारतीय शास्त्रज्ञांना हुलकावणी देते. मूलभूत विज्ञानातील संशोधनाला प्राधान्य देऊन केलेले संशोधन योग्यवेळी जगासमोर मांडले, तरच भारतीय शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळेल,” असे मत शास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले.

भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या स्मृतिदिनी विज्ञान भारती पुणेतर्फे एकमवे विज्ञान मासिक असलेल्या ‘सृष्टीज्ञान’च्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन प्रा. डॉ. संजय ढोले यांच्या हस्ते झाले. लिमयेवाडी येथील भाविसा सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी विज्ञान भारतीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. क. कृ. क्षीरसागर, विज्ञान भारती पुणेचे आर. व्ही. कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, ‘सृष्टीज्ञान’चे संपादक रमेश दाते यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय ढोले म्हणाले, “विज्ञान लेखक घडवणारे ‘सृष्टीज्ञान’ हे मासिक आहे. तीस वर्षांपूर्वी माझी ‘झेप’ नावाची कथा याच अंकात प्रसिद्ध झाली होती. त्यात सूर्यावर यान पाठवण्यासंबंधी लिहिले होते. आज भारत देखील आपले गगनयान पाठवण्यास सज्ज झाला आहे.

अंतराळ, भौतिक, रसायन, पदार्थ विज्ञानासह अन्य मूलभूत विज्ञान सोपे करून सांगणारे लेखक तयार व्हायला हवेत. त्यातून विज्ञानाचा प्रसार होईल. उपयोजित व चांगले संशोधन लोकांसमोर यायला हवे. हे मासिक मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, लेखन रुजविण्यास उपयुक्त ठरत आहे.”

Chinchwad : उद्योजक रमेश चौधरी यांना आयसीएआयचा पुरस्कार प्रदान

“सी. व्ही. रमण, होमी भाभा, सत्यंद्रनाथ बोस, जगदीशचंद्र बोस यांच्यासारखे महान शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांचा आदर्श घेऊन (Pune ) आपण करायला हवे. हिग्ज बोसान संकल्पना पीटर हिग्ज आणि संत्यंद्रनाथ बोस यांच्या संशोधनातून पुढे आली आहे. परंतु, वेळेवर संवाद न झाल्याने आणि संशोधनाविषयी चर्चा, प्रसिद्धी न झाल्याने तीन ते चार वेळा आपल्याला नोबेल पुरस्काराला मुकावे लागले,” असेही प्रा. डॉ. संजय ढोले म्हणाले.

डॉ. क. कृ. क्षीरसागर म्हणाले, “विज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी गेली 96 वर्षे सृष्टीज्ञान काम करत आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, चांगल्या दर्जाचे विज्ञान लेखक घडावेत, वाचकांना विज्ञान सहज व सोप्या पद्धतीने समजावे, यासाठी ‘सृष्टीज्ञान’चे कार्य महत्वपूर्ण आहे.” रमेश दाते यांनी अंकाच्या निर्मितीची व स्वरूपाविषयी मांडणी केली. अभिषेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.