BJP : पिंपरीत भाजपाच्या वतीने नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा निषेध

एमपीसी न्यूज – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणावरुन केलेल्या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड भाजपा (BJP ) महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करून महिलांनी घोषणाबाजी करत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी यावेळी केली.

भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य कविता हिंगे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, वर्षा गायकवाड, प्रतिभा जवळकर, सीमा बोरसे, पल्लवी मारकड यांच्यासह प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, प्रकाश जवळकर, देवदत्त लांडे, मुकेश चुडासमा, भरत सोलंकी, सहादु (अप्पा) धावडे, प्रदीप बेंद्रे यांच्यासह मोठया संख्येने विविध आघाडयांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pune :  तरच भारतीय शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळेल – डॉ. संजय ढोले

नितीश कुमार यांच्या वक्तव्याबद्दल भाजपा ‍महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे म्‍हणाल्या की, नितीश कुमार यांनी महिलांप्रती वापरलेले भाष्य हे भारतीय संविधानाचे अवमान करणारे आहे. विधानसभेतील एक नेता अशा प्रकारची कशी काय भाषा वापरु शकतो, हे मुख्यमंत्री पदाला न शोभणारे निर्लज्ज पातळीवरचं विधान आहे.

त्यांनी देशातील तमाम महिलांची माफी मागावी. अशा प्रकारची ही भाषा नितीश कुमार यांनी शोभत नाही. कारण ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याकडून विधानसभेची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे पण तसं काही झालं नाही. त्यांनी केलेले विधान हे अत्यंत निर्लज्ज पातळीवरचं विधान आहे, त्यांनी देशभरातील महिलांची माफी मागावी, अशा शब्दात त्यांनी (BJP ) टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.