Pune : व्यापा-याला 20 कोटींची खंडणी मागणा-या तिघांना फिल्मी स्टाईलने पाठलाग करत अटक

मुलाला पळवून नेऊन जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – मुलाला पळवून नेऊन त्याला सोडून देण्यासाठी 20 कोटींची खंडणी मागूननंतर 15 लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि.6) घडली. याप्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत अटक केली आहे.

शहाबाज फिरोज खान (वय 28), सुयश वाघमारे (वय 27), व अन्य एक जण अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फिर्यादी महेंद्र ओंकारमल निफजिया, (वय57) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र निफजिया यांचा मुलगा दर्शन (वय 27) याला आरोपींनी शनिवारी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान त्यांच्या भवानी पेठेतील राहत्या घराच्या बाहेरून पळवून नेले. त्यानंतर महेंद्र यांना 20 कोटींची खंडणी मागून 15 लाख रुपये न दिल्यास दर्शन याला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. महेंद्र यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी कारवाई करीत आज या तिघांचाही फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.